विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – संयुक्त प्रवेश मंडळाने सोमवारी जेईई मेन परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. उर्वरित दोन सेशनच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षाच्या तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडूनजाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जेईई मेनचा निकाल ऑगस्टपर्यंत जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‌भूमीवर ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून जेईई मेन 2021 तिसऱ्या सेशनच्या परीक्षा 20 ते 25 जुलै दरम्यान होणार आहे तर जेईई मेन 2021 चौथ्या सेशनच्या परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव परिक्षेचा अर्ज भरला नसेल त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या सेशनच्या परिक्षेसाठी 8 जुलैपर्यत अर्ज भरता येणार आहे. तर चौथ्या सेशनसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना 9 ते 12 जुलै दरम्यान अर्ज भरता येणार आहे.

शिवाय, विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडता येणार आहेत. यावर्षी या परीक्षेसाठी सद्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे.

You missed