रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळताना हाय व्होल्टेज तारेला स्पर्श; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11054*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

187

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर – जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना एका चिमुरड्याचा हाय व्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाला आणि विजेचा जब्बर धक्का लागल्याने त्याचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. या ९ वर्षीय बालकाचे नाव दक्ष चंद्रापाल सोनेकर असे आहे. दक्ष हा तिसऱ्या वर्गात शिकत होता आणि तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दक्षच्या निधनाने त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दक्ष हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलांसोबत वेकोलीच्या पाच नंबर बंकर परिसरात खेळत होता. बंकर नंबर 5 हा पूर्णपणे रेतीने भरलेला परिसर असून याठिकाणी अंदाजे 25 ते 30 फूट उंचीचे रेतीचे ढिगारे आहेत. या परिसरातील लहान मुले दररोज या ढिगाऱ्यांवर खेळत असतात. मात्र याच ढिगाऱ्यांना स्पर्श करून हाय व्होल्टेजच्या ताराही गेल्या आहेत. या तारांपेक्षा रेतीच्या ढिगाऱ्यांची उंची अधिक आहे.

नेहमीप्रमाणे मंगळवारी लहान मुले रेतीच्या ढिगाऱ्यांवर खेळायला गेली. यावेळी मुले ढिगाऱ्यांवरून खाली उतरण्यासाठी घसरत असताना दक्षचा हाय व्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाला आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. तारेचा स्पर्श होताच दक्षचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून भेदरलेल्या इतर मुलांनी तातडीने धाव घेऊन परिसरातील इतर लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दक्षच्या आई-वडिलांना घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, नऊ वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.