सिनेसृष्टी सुन्न! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11043*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

157

सिनेसृष्टी सुन्न! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – आज सकाळी बॉलिवूड विश्व अतिशय दुःखद बातमीने जागं झालं. सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीप कुमार ९८ वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या वेळोवेळी सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत असत. त्यानुसार श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. मात्र प्रकृती स्थिर झाल्यानंतर ते घरीदेखील परतत होते. 6 जून रोजी त्यांना खारमधील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत त्यांच्या फुफ्फुसांत जमा झालेले पाणी काढण्यात आले होते. परंतु त्यानंतर पुन्हा श्वास घेण्यास त्रास झाल्याने 29 जून रोजी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत होती. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचे पूर्ण नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखले जात होते. सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कार पटकावणाऱ्या दिलीप कुमार यांनी 1944 मध्ये ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मग पुढे पाच दशके म्हणजेच 50 वर्षे या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रप्रेमींना भुरळ घातली. 65 चित्रपट दिलीप कुमारांच्या नावावर आहेत. अंदाज, आन, दाग, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. आज दिलीप कुमार यांच्या जाण्याने पूर्ण बॉलिवूड विश्व सुन्न झाले आहे.