तीन वर्षीय चिमुकल्याचा असाही करुण अंत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10985*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

545

तीन वर्षीय चिमुकल्याचाअसाही करुण अंत

-कांक्रीट लिफ्ट कोसळली अंगावर

विदर्भ वतन, मुंडीकोटा : जमनागर येथील जिगर पंकज तिडके वय ३ वर्ष मुलाचे अंगावर दिनांक ३ जुलै २0२१ रोजी सकाळी ९.00 वाजताच्या सुमारास कांक्रीट लिफ्ट कोसळल्याने जखमी होऊन उपचारादरम्यान नागपूर मेडिकल येथे आज दिनांक ४ जुलै २0२१ रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास निधन झाले. जिगर यास बहीण, आई-वडील, आजोबा-आजी असा आप्त परिवार आहे.
सविस्तर वृत्त असे की, मोरेश्‍वर तिडके यांचे घरकुल आवासाचे छताचे कार्य करण्यासाठी लाखेगाव येथील मन्सूर खोब्रागडे यांचे मालकीचे लिफ्ट घरकुलाचे स्लॅब बनविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. बांधाकाम शेजारी चार मुले झोपडीत राहत होती. रंजना, योगेश्‍वरी, नैतिक, राहत असलेल्या झोपडीत बसलेले होते तर पंकज हा बाहेर उभा राहून बघत होता. दरम्यान घराचे छत ढलाई काम सुरू झाले होते. कांक्रीट स्लॅबवर जाताच लिफ्ट नीटनेटकी बांधली नसल्याने लिफ्ट कांक्रीटसह झोपडीवर कोसळली. जिगरला काही कळण्याचे आत तो लिफ्ट बकेतमध्ये दाबला गेला.
घरात असलेले तीन बालके थोडक्यात बचावले. जिगरला गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ तुमसर उपजिल्हा रुग्णालय येथे नंतर सरकारी दवाखाना मेडिकल नागपूर येथे उपचारार्थ हलवण्यात आले. अखेर उपचारादरम्यान दुपारी ३.३0 वाजता त्याचा मृत्यू झाला. लिफ्टच्या कामावर १0 मजूर असल्याचे सांगण्यात येते.