आई व मुलीचे एकाच दिवशी पुसले कुंकू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10980*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

209

आई व मुलीचे एकाच दिवशी पुसले कुंकू

  • सासर्‍याचे प्रेत नेताना अपघातात जावयाचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चिमूर – चिमूर कांपा महामार्गावरील शंकरपूर जवळील हिरापूर येथे सासर्‍याचे प्रेत शवविच्छेदनसाठी नेत असताना वाटेत त्या वाहनाला अपघात झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात वाहनात असलेल्या जावयाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. यासह वाहनातील इतर सहा जण जखमी झाले. शंकर गोमा खंडाते (४८) असे मृत जावयाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा वाजता हिरापूर येथील किसन चिडांम यांचा एका शेतावर मृत्यू झाला. पोलिसांनी र्मग दाखल केला असून हे प्रेत शवविच्छेदनासाठी त्यांच्या नातेवाईकाकडे सोपविल्या गेले. नातेवाईकांनी गावातील पिकअप भाड्याने घेतली. त्या वाहनात प्रेत टाकून गावातील नागरिक व नातेवाईक शवविच्छेदनासाठी चिमूर येथे घेऊन गेले परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. प्रेत घेऊन जात असताना पीकअप वाहनाला चिमूर जवळील खरकाडा येथे अज्ञात ट्रकने धडक दिली. त्यात पिकअपमध्ये बसून असलेल्या वाहन चालकासह इतर सहा लोक गंभीररित्या जखमी झाले. गावातील लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. त्यात जावई शंकर गोमा खंडाते (४८) यांचा आज रविवारी (दि.४) पहाटे ४ वाजता ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे मृत्यू झाला. तर जखमींमध्ये वाहनचालक रतन सोनटक्के, हरीश पंचवटे, गजानन कन्नाके, विजय चिडाम (पुतण्या), राजू चिडाम ( पुतण्या) सर्व राहणार हिरापूर तर डोंगरगाव येथील दिलीप गोमा खंडाते (जावयाचा भाऊ) गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात चालकविरुद्ध २७९, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.