नामनिर्देशनपत्र सादर करण्यास मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10976*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

नामनिर्देशनपत्र सादर करण्यास मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या जागांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, सोमवार (ता.५) अर्ज करण्याला शेवटची मुदत असून, दुपारी ३ वाजेपर्यंतच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. अद्यापही मुख्य राजकीय पक्षांच्या बहुतांशी उमेदवारांकडून नामांकन सादर झाले नसल्याने उद्या सोमवारला शेवटच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात अर्ज सादर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांसह पंचायत समितीच्या ३१ जागांकरिता पोटनिवडणुका जाहीर केल्या आहे. त्यासंदर्भातील आचारसंहिताही लागू झाली आहे. आज रविवारपर्यंतही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जागा वाटपांबाबत बैठकांचा जोर सुरूच असल्याचे दिसून आले. तर भाजपकडूनही काही उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. आज रविवार असल्याने अर्ज स्वीकारण्यात आले नाही.
शनिवार (ता.३) पर्यंत नागपूर जि.प. साठी ८ व पंचायत समित्यांकरिता १0 असे १८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अद्यापही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह भाजपकडून अधिकृत उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर झाली नसल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. तर पक्षांकडून इच्छुकांना अर्ज भरून तयार ठेवण्याच्या सूचना केल्या असल्यामुळे उद्याच सर्वच पक्षांच्या उमेदवारांक डून अर्ज सादर होणार हे निश्‍चित आहे.

सर्कलनिहाय सदस्यत्व रद्द झालेले सदस्य –
नाव सर्कल पक्ष
मनोहर कुंभारे केळवद काँग्रेस
ज्योती शिरसकर वाकोडी काँग्रेस
अर्चना भोयर करंभाड काँग्रेस
कैलास राऊत बोथिया पालोरा काँग्रेस
योगेश देशमुख अरोली काँग्रेस
ज्योती राऊत गोधनी रेल्वे काँग्रेस
अवंतिका लेकुरवाळे वडोदा काँग्रेस
अनिल निधान गुमथळा भाजप
राजेंद्र हरडे नीलडोह भाजप
अर्चना गिरी इसासनी भाजप
भोजराज ठवकर राजोला भाजप
सुचिता ठाकरे डिगडोह राकाँ
पूनम जोध भिष्णूर राकाँ
देवका बोडखे सावरगाव राकाँ
चंद्रशेखर कोल्हे पारडशिंगा राकाँ
समीर उमप येनवा शेकाप