गेल्या 24 तासात 15 कोरोनामुत ; 7 पॉझेटिव्ह

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10963*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

210

गेल्या 24 तासात 15 कोरोनामुत ; 7 पॉझेटिव्ह

 

-जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1862 बेड उपलब्ध

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,यवतमाळ- गेल्या 24 तासात (4 जुलै) जिल्ह्यात 7 जण पॉझेटिव्ह तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 602 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 7 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 595 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 35 रुग्ण एक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72744 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70923 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील एक, नेर एक, पुसद चार व इतर शहरातील एका रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 82 हजार 648 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 9 हजार 864 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.66 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.16 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1862 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 43 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1862 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 28 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 609 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 14 रुग्णांसाठी उपयोगात तर 622 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.