Home Breaking News ११ जुलैनंतर राज्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता

११ जुलैनंतर राज्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10958*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

165 views
0

११ जुलैनंतर राज्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : पुणे – मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुढील पाच दिवस तरी आपले दर्शन देणार नाही. मात्र ११ जुलैनंतर राज्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनचे वारे हिमालयातच रेंगाळत राहिल्याने अजून तरी पावसासाठी पोषक स्थिती नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

काल रविवारी हवामान विभागाने १० जुलैपर्यंत तरी राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे निदान ११ जुलैनंतर मोठा पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी १ जुलै रोजी देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र महाराष्ट्रात तो सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकरीवर्ग चिंतेत दिसत आहे. पण आता ही चिंता आणखी काही दिवसच राहणार आहे. ४ ते ८ जुलै दरम्यानच्या अंदाजानुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भाग वगळता संपूर्ण राज्यात कोरडे वातावरण राहणार आहे. यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने उन्हाळा कमी जाणवला होता. मे महिन्यात तापमान जेवढे जास्त असेल तेवढा जास्त पाऊस जून-जुलैमध्ये अपेक्षित असतो. मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच मान्सूनने निराशा केली. ही निराशा आणखी पाच दिवस राहणार आहे. ११ जुलैनंतर मात्र दमदार पावसाचे पुरागमन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.