Home Breaking News बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येणार

बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येणार

0
बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येणार

बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – केंद्र सरकारने बिटकॉईन व्यवहार अवैध ठरवले आहेत. शिवाय या आभासी चलन व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे. अभिनेत्री नेहा धुपिया, सनी लिओनी, झरीन खान, हुमा कुरेशी, सोनल चौहान, आणि बॉलीवूडचं मोठं नाव अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचं प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे. राज कुंद्राप्रमाणे त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या व्यवहारातील बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी राज कुंद्रा यांना प्रश्न विचारले. जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स बजावले होते. त्यांनतर राज कुंद्रांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ९ तास चौकशी केली.

बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अमित भारद्वाज हा मुख्य आरोपी आहे. या मुख्य आरोपीने एक वेबसाईट सुरु करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांनी फसवले आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी अमित भारद्वाज याला अटक केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत बॉलिवूडमधल्या अनेकांची नवे या घोटाळ्यात बाहेर आली. याच घोटाळ्यात राज कुंद्राचे नाव बाहेर आल्यानंतर, ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी मुंबईत बोलावले होते.

2009 मध्ये बिटकॉईनचा शोध सातोशी नाकामोतो नावाच्या एका जपानी इंजिनियरने लावला. बिटकॉईन हे एक नवं डिजीटल चलन आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंगवर आधारित व्यवहारांसाठी याची निर्मिती झाली. बिटकॉईन खरेदी केल्यानंतर कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर त्याचे ई वॉलेट तयार होतं.
या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एकपेक्षा जास्त वॉलेट तयार करु शकतात. याचा वापर ई-मेलप्रमाणे केला जातो. पण यात फरक केवळ इतकाच आहे की, याचा पत्ता केवळ एकदाच वापरता येतो. याचा वापर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. सध्या बिटकॉईनचं मूल्य भारतीय चलनानुसार तब्बल 70 हजारापेक्षा जास्त आहे. तसेच याचं नियंत्रण कोणत्याही एका अधिकृत संस्थेकडे किंवा सरकारकडे नाही.