गडचिरोलीतील सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर ग्रामस्थांचा चक्काजाम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10948*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

169

गडचिरोलीतील सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर ग्रामस्थांचा चक्काजाम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गडचिरोली- गडचिरोलीच्या कमलापूर क्षेत्रातील जवळपास 60 गावे अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या गावांचा सरकारने लवकरात लवकर विकास करावा, या मागणीसाठी आज रविवारी भ्रष्टाचार निवारण समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी अल्लापल्ली- सिरोंचा महामार्गावरील कमलापूर फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करून जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे या महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येत असून कमलापूर क्षेत्रातील जवळपास 60 गावांमध्ये आजही पक्के रस्ते नाहीत. अनेक भागात विद्युत सेवा  पोहोचली नाही. जसा विकास हवा तसा विकास कोणत्याही या भागात झालेला नाही. या गावांकडे लोकप्रतिनिधी नेहमीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून गावांच्या विकासाकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी कमलापूर क्षेत्रातील ग्रामस्थांनी सिरोंचा- आलापल्ली मार्गावर ग्रामस्थांचा चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात काही प्रतिष्ठित नागरिक आणि माजी सरपंच उपस्थित होते.