फुलांची दुनिया

रंग फुलांचे सांडले
फुल झाडावरी फार
जणू नवं वधू झाली
हीच वसुंधरा नार
दारी पारिजात सडा
भासे अंगणी रांगोळी
सोडी परस बागेत
गंध मधाळ बकुळी
बसे अबोली मोगरा
झुले घेत वेणीवरी
पुष्प कमळाचे जली
मनी प्रसन्नता भरी
नाना रंग गुलाबाचे
मऊ पाकळी पाकळी
फेडी डोळ्याचे पारणे
मस्त सकाळी सकाळी
ऋतू वसंत स्वागता
फुले हा गुलमोहर
पांघरतो अंगावरी
लाल रंगाची चादर
खुले चांदण्या रातीत
रातराणी निशिगंध
होती प्रेमात पाखरे
मुक्त स्वच्छंदी बेधुंद
फुले जाई जुई चंपा
चाफा चमेली शेवंती
किती वर्णावी महती
गंध हवेत पेरती
छान फुलांची दुनिया
भूमीवरी स्वर्ग खरा
डोळ्यामध्ये साठवावा
हाच अनोखा नजारा
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
    जिल्हा:- सोलापूर
      9405237081

You missed