राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मनपाने उभारावा – प्रा कवाडे व जयदीप कवाडे यांची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10928*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

271

राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मनपाने उभारावा
– प्रा कवाडे व जयदीप कवाडे यांची मागणी

विदर्भ वतन, नागपूर : महात्मा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. लोकराजा प्रजाहितदक्ष, वंचित, उपेक्षित, बहुजनांचा हितकर्ता म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचा गौरव केला जातो सामाजिक सुधारणा, समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी सर्वस्व पणाला कृतीशिल राजा त्याचे कार्य अजरामर आहे. लोकराजा शाहू महाराजांचा पूणार्कृती पुतळा महापालिकेच्या वतीने नागपूर शहरात उभारण्यात यावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पाटीर्चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांची भेट घेऊन ही आग्रही मागणी केली आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुणार्कृती पुतळा समिती निर्माण करण्यात आली. यात सर्व पक्षीय सदस्यांचा समावेश राहणार आहे महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करून नागरी विभागाकडून मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही महापौरांनी दिल्याची जयदीप कवाडे यांनी माहितीत सांगितले आहे.