पिस्तूलातून गोळी झाडून पोलिस जवानाने केली आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10919*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

135

पिस्तूलातून गोळी झाडून पोलिस जवानाने केली आत्महत्या

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर-आधी कोरोना आणि नंतर ब्लॅक फंगसच्या आघातामुळे त्रस्त झालेल्या विशेष सुरक्षा पथकातील जवानाने स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास झिंगाबाई टाकळी येथे घडली. प्रमोद शंकर मेरगुवार (४६), असे मृताचे नाव आहे.
ग्रामीण पोलिस दलात तैनात असलेल्या प्रमोद यांना काही वर्षांआधी विशेष सुरक्षा पथकात नियुक्त करण्यात आले होते. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते सावरत नाही तोच ब्लॅक फंगसने त्यांना घेरले. यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. त्यांच्यावर आधी अँलेक्सिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पण, त्याचा त्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी ते हैदराबाद येथेही गेले होते. पण, त्यांना यश आले नाही .त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता. तर दुसर्‍या डोळ्याला त्रास होता. त्यांची नजर अधू व्हायला लागली होती. म्युक्रोमायकोसिसमुळे ते त्रस्त झाले होते.
डोळ्यांचा त्रास त्यांना सहन होत नव्हता. यामुळे ते तणावात रहायला लागले होते. याच त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास झिंगाबाई टाकळीतील निवारा हाऊसिंग सोसायटी येथील त्यांच्या घरी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांसह मानकापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. याप्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.