तारापूरच्या केमिकल कारखान्यात रात्री भीषण स्फोट, ५ जण जखमी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10900*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

183

तारापूरच्या केमिकल कारखान्यात रात्री भीषण स्फोट, ५ जण जखमी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : पालघर – जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसीतील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात पाच कामगार जखमी झाले असून

कोलवडे स्थानिक तरुणांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.जखमींवर उपचार सुरु आहेत. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी समजल्या जाणाऱ्या भारत केमिकल्स या कारखान्यातील प्लान्ट नंबर एल १३ व एल ३० मध्ये काल रात्री अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र,या घटनेत अचानकपणे स्फोट झाल्यामुळे पाच जण जखमी झाले. कारखान्यात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेत जखमी झालेल्या ५ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कारखाना व्यवस्थापन मात्र स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत माहीती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.