इमामवाडा दलित वाचनालय येथे समाजभवन बांधा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10895*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

151

इमामवाडा दलित वाचनालय येथे समाजभवन बांधा

– आम आदमी पार्टी दक्षिण पश्चिम नागपुर 

विदर्भ वतन,नागपूर : आम आदमी पार्टी दक्षिण – पच्छीम तर्फे समाजभवन निर्मिती करीता मा. उपायुक्त धंतोली झोन ह्यांना श्री अजय धर्मे ह्यांच्या मार्गदर्शनात प्रिया डाबरे यांच्या नेतृत्वात अनेक महिलांसह निवेदन सादर करण्यात आले.
इमामवाडा दलित वाचनालय येथे खूप जुने मोडकळीस आलेले शौचालय होते. सद्या सर्वांकडे शौचालयाची व्यवस्था असल्यामुळे त्याची फारशी गरज राहलेली नाही. दोन वर्ष्यापूर्वी मनपा तर्फे तोडण्यात आली. शौचालय तोडलेल्या मोकळ्या जागेवर समाजभवन, वाचनालय किंवा व्यायामशाळेची निर्मिती व्ह्यावी अशी बऱ्याच दिवसापासून स्थानिक नागरिकांची मागणी होती. आज त्या जागेवर असामाजिक तत्वांचा वावर वाढलेला आहे असून दुरूपयोग सुरू आहे. मागील दोन वर्ष्यापासून समाजभवन निर्माण करण्यासंबंधी निवेदन दिले होते परंतु त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तरी त्यासंबंधित आराखडा व प्रस्ताव तयार करून समाजभवन निर्मिती करण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी अशी निवेदनामार्फत विनंती करण्यात आली.
निवेदन देतेवेळी पक्षाचे पदाधिकारी श्री प्रशांत निलटकर जिल्ह्या सहसंयोजक, आकाश राठोड़,अनिल सोमकुवर, मायाताई गायकवाड, जीतू सिन्हा, नम्रता खोंडे, ज्योति गायकवाड, सुनदा नाईक, अंकित भदोरिया तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.