Home Breaking News बंगळुरू शहरात स्फोटांसारखाच जोरदार आवाज ऐकू आला आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ 

बंगळुरू शहरात स्फोटांसारखाच जोरदार आवाज ऐकू आला आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10863*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

103 views
0

बंगळुरू शहरात स्फोटांसारखाच जोरदार आवाज ऐकू आला आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – बंगळुरू शहरात गुरुवारी दुपारी 12.20 वाजता स्फोटांसारखाच जोरदार आवाज ऐकू आला आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक घरांच्या खिडक्यांना या स्फोटामुळं जोरदार हादरे बसले आणि ट्विटरसह सर्व समाजमाध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू झाली. हा आवाज सोनिक बूमचा म्हणजेच अंतराळातून आलेला असावा, असं बंगळुरूतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

बंगळुरू शहरात असा आवाज येण्यासारखी कुठल्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सर्व पोलीस स्थानकांना याविषयी माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आतापर्यंत अशी कुठलीही स्फोटाची घटना शहरात घडल्याची माहिती मिळालेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

बंगळुरूमध्ये लवकरच तेजस विमानांचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. लवकरच तेजस विमानांची पहिली खेप बंगळुरूत दाखल होणार असून एचएएल त्याच्या तयारीत व्यस्त असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. कदाचित, त्याच्याशी संबंधित हा आवाज असावा, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र एचएएलकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग ही रोजच सुरु असणारी प्रक्रिया आजही सुरु आहे. शुक्रवारी नवं आणि वेगळं काहीच घडलेलं नसल्याचं एचएएलनं म्हटलंय. त्यामुळं हा आवाज कसला होता, याबाबत एचएएल काहीच भाष्य करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एचएएलच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.