Home आरोग्य कोरोना साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहार शोधण्यासाठी मा.न्यायाधीश किंवा मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी...

कोरोना साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहार शोधण्यासाठी मा.न्यायाधीश किंवा मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करावी : देवेंद्र वानखडे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10848*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

130 views
0

कोरोना साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहार शोधण्यासाठी मा.न्यायाधीश किंवा मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करावी : देवेंद्र वानखडे

विदर्भ वतन,नागपूर : मागील दीड वषार्पासून राज्यात कोरोणाचा प्रादुर्भाव आहे. या महामारी दरम्यान नागपूर महानगर पालिका क्षेत्रात संपूर्ण अधिकार मनपा आयुक्त यांच्याकडे आहेत. या मुळे शहरात लागू होणा-या महामारी नियमांची अंमलबजावणी करणे आणि संपूर्ण महामारी नियंत्रित करण्याची जबाबदारी सुद्धा आयुक्त यांच्या कडे होती-आहे.
याचाच अर्थ केंद्र किंवा राज्य सरकार कडून महामारी नियंत्रित करण्यासाठी आलेला फंड तसेच मनपा कडून महामारीवर केलेला खर्च हा मा.आयुक्त यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या परवानगीने करण्यात आला आहे. परंतु आज महापौर दयाशंकर तिवारी यांचा कोरोना साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहार शोधण्यासाठी मा.आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्याचा निर्णय म्हणजे केवळ खाणापूर्ती किंवा केविलवाणा प्रकार आहे.
  आम आदमी पार्टी आज राज्य सरकरला विनंती करते की नागपूर महानगर पालिकेत कोरोना काळात झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे मा. न्यायधीश किंवा मा. राज्य सचिव,  यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून कोरोन साहित्य खरेदीत जे गैरव्यवहार झाले असतील ते जनतेसमोर येतील. एकूणच आम आदमी पार्टी मा. महापौर यांच्या निर्णयाचा निषेध नोंदविते.