मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर भागात लसीकरणासाठी चेंगराचेंगरी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10843*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

182

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर भागात लसीकरणासाठी चेंगराचेंगरी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : छिंदवाडा, मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर भागात लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय.

कोविड १९ संक्रमणाविरुद्ध देशभर लसीकरण मोहीम राबवली जात असली तरी अनेक भागांत अद्याप नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी पडतोय. सरकारकडून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केलं जात असलं तरी लसीच्या कमतरतेमुळे अनेक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. असाच एक प्रकार सौसरच्या लोधी खेडा नावाच्या गावातही घडल्याचं दिसून आलं. लसीकरणासाठी पोहचलेल्या नागरिकांची गर्दी इथं इतकी वाढली की इथं एका क्षणी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
छिंदवाडाच्या लोधी खेडा लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच मोठी गर्दी जमा झाली होती. केंद्राचं शटर बंद असल्यानं बाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. सीमित संख्येत लसीचे डोस केंद्रावर उपलब्ध असल्यानं ठराविक संख्येलाच आत प्रवेश दिला जाणार होता. त्यामुळे केंद्राचं शटर उघडल्याबरोबर नंबर मिळवण्यासाठी आणि हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या गर्दीत अनेक महिला आणि वृद्धांचाही समावेश होता. पुढे जाण्याच्या प्रयत्नात नागरिक एकमेकांच्या अंगावरही कोसळले. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही फज्जा उडाला.

मात्र, लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिकांना टोकन वाटून आणि अतिरिक्त लसीच्या डोसची व्यवस्था करून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

जिल्हा लसीकरण अधिकारी एल एन साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सौसरमध्ये कोविशिल्ड लसीचे तीन हजार डोस पुरवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत सौसर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक फटका बसला होता. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांचा अधिरता वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवली.