Home Breaking News डाक्टर दिनाच्या दिवशीच डाक्टर दाम्पत्याने केली आत्महत्या

डाक्टर दिनाच्या दिवशीच डाक्टर दाम्पत्याने केली आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10839*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

153 views
0

डाक्टर दिनाच्या दिवशीच डाक्टर दाम्पत्याने केली आत्महत्या

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :पुणे- वानवडी आझाद नगर येथील डॉक्टर दाम्पत्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉक्टर्स दिन साजरा होत असतानाच ही घटना घडल्याने परिसरात व पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.अंकिता निखिल शेंडकर (२६) आणि निखिल दत्तात्रय शेंडकर (२८) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगर इथे राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिता यांची क्लिनिक आझाद नगर येथील गल्ली नंबर २ या ठिकाणी आहे. तर, निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते.
काल रात्री घरी परतत असताना दोघांमध्ये फोनवर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास निखिल घरी पोहोचले तेव्हा अंकिता घरातील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. डॉक्टर अंकिता यांनी गळफास घेतल्याची माहिती वानवडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर अंकिता यांचा मृतदेह त्यांच्या ऊरुळीकांचन येथील माहेरी नेण्यात आला. पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने डॉ. निखिल यांनी बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये पंख्याला गळफास लावून घेतला.