
फटकार
गल्लीत तोच आहे दिल्लीत तोच आहे
त्याच्याशिवाय त्याला कोणी नकोच आहे
त्याचाच पक्ष आणि त्याचेच कार्यकर्ते
खाण्यास सर्व जागी त्यांचीच चोच आहे
पर्याय द्या कुणीही त्याला मुळी न चिंता
काही करा परंतु येणार तोच आहे
कोणाकडे करावी तक्रार या ठगाची
जावे तिथे पाहावे त्याचीच पोच आहे
देशात लोकशाही झाली बटीक यांची
याची इथे कुणाला उरली न बोच आहे
@ प्रा.जयसिंग गाडेकर
आळे,जुन्नर,पुणे.
भ्रमणध्वनी -९९७०३४१६४६

