
पुढऱ्याच्या घरून पुढारी निर्माण होतो कार्यकर्ते हा समाजातुन निर्माण होत असतो म्हणून तो समाजाच्या आधार स्तंभ असतो – अँड. घाटे
विदर्भ वतन, नागपूर – फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचा खऱ्या कर्णधार हा कार्यकर्ता असतो तो पुढाऱ्यांच्या घरून जन्माला येत नाही तो समाजात जन्म घेतो पुढाऱ्यांच्या घरून पुढारी जन्माला येतात असे प्रतिपादन आंविमो चे जेष्ट नेते अँड. सुरेश घाटे यांनी व्यक्त केले ते आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने आयोजित आंबेडकरी चळवळीतील करोना च्या प्रादुर्भावात निधन झालेल्या मान्यवरांच्या स्मृतीत श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला प्रामुख्याने आंविमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे ,रिपब्लिकन नेते राजन वाघमारे, सुदर्शन वाल्मिकी मोर्चा चे अध्यक्ष सुभाष बढेल, पीरीपा चे युवा नेते प्रकाश कांबळे, आंविमो चे प्रदेश संघटक देवेंद्र बागडे हे उपस्थित होते.
या प्रसंगी बागडे पुढे म्हणाले या करोना च्या प्रादुर्भावात आंबेडकरी चळवळीतील जाहबाज हिरे चळवळीला सोडून गेले त्या मुळे समाजाचे कधीन भरून निघणारे नुकसान झाले बबन लवात्रे, भाऊ लोखंडे, अशोक कोल्हटकर, प्रकाश रामटेके, अनुप थुल, डॉ नाना मेश्राम, विरा साथीदार, रमाबाई पाटील, संजय गोडबोले, नरेंद्र सुर्यवंशी, थाँमस काबळे,बबन बोदांळे,सुरेश तेलंग, किशोर गजभिये, राजु बाहदूरे,मनोहर रामटेके, एम.बी राऊत, मदन थुल ,परमानंद घाटे डॉ कांबळे, विमलसुर्य चिमनकर, भिमराव बोरकर, यांच्या स्मृती आंबेडकरी विचार मोर्चा जिवंत ठेवणार आहे कारण यांची प्रेरणा घेऊन चळवळीला गतिमान करायचे आहे या असे बागडे यांनी ठामपणे सांगितले.
रिपाइंचे राजन वाघमारे यांनी या प्रसंगी आपल्या शोककळा व्यक्त केला नामदेवराव निकोसे म्हणाले या चळवळीचा कार्यकर्ते यांच्या परिवारातील लोकांची दखल आंविमो घेणार सुभाष बढेल यांनी सफाई कामगार यांनी करोना च्या प्रादुर्भावात जी सेवा केली शासनाने त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचा खर्च उचलावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मामासाहेब मेश्राम यांनी तर सुत्रसंचालन देवेंद्र बागडे व आभार प्रदर्शन शालीक बांगर यांनी केले या प्रसंगी शासकीय मेडिकल काँलेज येथील तिस परिचारिका यांना करोना योद्धा या पुरस्कार देवून आरोग्य दूत राजूदादा पांजरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला दिवंगत परिवारातील लोकांची उपस्थिती होती.

