प्रॉपर्टीच्या वादातून मामेसास-याची हत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10814*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160

प्रॉपर्टीच्या वादातून मामेसास-याची हत्या

विदर्भ वतन, नागपूर : शहरात हत्येच्या घटनांचे सत्र सुरूच असून बुधवारी वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत प्रॉपर्टीच्या वादातून मामे सास-याची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. धारदार शस्त्रांनी ही हत्या करण्यात आली. यावेळी मदतीकरिता आलेल्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केली. पोलिसांनी आरोपी सख्ख्या साळभावासह तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. राजेश पन्नालाल यादव असे मृतकाचे नाव आहे.
फियार्दी भोला एकनाथ राणे (वय ३३ वर्ष) हे वाठोडा हद्दीतील बिडगाव ग्रामपंचायत जवळ असलेल्या झोपडपट्टी नागपूर येथे राहतात. ते २९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या घरी होते. यावेळी, त्यांचा सख्खा साळभाऊ हा आरोपी राजू सोनीलाल सिंदुरीया (वय ४५, रा. गृहलक्ष्मी सोसायटी, बिडगाव, नागपूर), आकाश चिंतामण मेर्शाम (वय ३0, रा. स्वागतनगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर), रोहित उर्फ गोलू सुरेश नंदनवार (वय १९, रा. नंदनवन, नागपूर) आला. आरोपींनी भोला राणे यांच्या सासूच्या प्रॉपर्टीच्या कारणावरून फियार्दीचे मामेसासरे राजेश यादव (वय ४८, रा. मानकापूर चौक) यांना लाकडी दांड्याने, तलवारीने मारले.