अव्वल कारकुन व तांत्रिक सहायकाला ४0 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10809*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

267

अव्वल कारकुन व तांत्रिक सहायकाला ४0 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

विदर्भ वतन,अमरावती : एका शासकीय महिला कर्मचा-याला त्यांच्या विरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये कुठलीही कारवाई न होवू देण्याकरीता ५0 हजार रुपयाची लाच मागणा-या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन व तांत्रिक सहायकाला प्रत्यक्ष ४0 हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचतप प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले असून दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला शासकीय कर्मचारी असून त्यांच्या विरूध्द २९ जून रोजी एका शासकीय रास्त दुकानदार यांनी तक्रार केली होती. याच तक्ररीची चौकशी सुरू असून या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यरत असलेले अव्वल कारकुन, पुरवठा निरीक्षक नारायण चव्हाण, वय २९ तसेच अविनाश भगत, वय २९ तांत्रिक सहायक, यांनी ५0हजार रुपयाची लाच मागितली होती. सदर महिलेने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता ३0 जून रोजी प्रत्यक्ष आरोपी चव्हाण व भगत यांना ४0 हजार रुपयाची लाच घेतांना अधिका-यांनी रंगेहाथ अटक केली. दोन्ही आरोपि विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.