कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलाना मिळणार शासकीय योजनांचा लाभ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10804*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

193

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलाना मिळणार शासकीय योजनांचा लाभ

विदर्भ वतन, मुंबई: घरातील कर्ता व्यक्तीच कोरोनाने हिरावल्यामुळे संबंधित कुटुंबीयांसमोर दैनंदिन जीवनक्रम सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. कर्त्यां पुरुषाच्या मृत्युमुळे वैधव्य आलेल्या जिल्ह्यात एक हजार १४ महिला असल्याची माहिती असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.
राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या धोरणाप्रमाणे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या कुटुंबीयांना त्यांच्या गरजेनेनुसार आणि पात्रतेनुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील २0 आॅगस्ट २0२१ च्या शासन निर्णयान्वये विविध योजनांचा लाभ द्यावयाचा आहे. विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. निपाणीकर यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत गावनिहाय सर्वेक्षण केले आहे. कोविड-१९ मुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील एक हजार १४ महिलांची तालुकानिहाय आणि वयोगटानिहाय यादी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली आहे. या आदेशामुळे विधवा महिलांना दिलासा मिळणार आहे.
या विधवा महिलांपैकी सर्व महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, तसेच ४१ ते ६५ वयोगटातील ४९६ महिलांना संजय गांधी निराधार योजना, ६५ वर्षांवरील २८७ महिलांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नवृत्तीवेतन योजना तसेच १८ ते ४१ वयोगटातील २३१ महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्तिवेतन योजनांचा लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.