Home Breaking News संशयाचे भूत मनात संचारले,दारूडयाने पत्नीचे जीवनच संपविले

संशयाचे भूत मनात संचारले,दारूडयाने पत्नीचे जीवनच संपविले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10799*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

230 views
0

संशयाचे भूत मनात संचारले,दारूडयाने पत्नीचे जीवनच संपविले

विदर्भ वतन, चिमूर- संशयखोर दारूडया पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन काठीने बदळून तिची हत्या केली. ही घटना मंगळवारी (२९जून) रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. विशाखा दीक्षित पाटील (२९) असे मृत महिलेच नाव तर दीक्षित हरीदास पाटील (३९) असे आरोपी पतीचे नाव आहे. पतीने दारूच्या नशेत तर्र असताना पत्नीचा खून केला.
आरोपी पती दीक्षित हरीदास पाटील (३९) हा पत्नीवर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे त्याचे पत्नी विशाखा दीक्षित पाटील (२९) हिचे सोबत नेहमीच भांडण होत असे. संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले होते. त्यातून पती-पत्नीमध्ये घरगुती वाद-विवाद वाढले होते. घटनेच्या दिवशीही कडाक्याचे भांडण झाले होते. रात्रीच्या सुमारास मोठया काठीने पतीने पत्नीला मारहाण केल्याने ती जागीच ठार झाली. मृतक विशाखा हिला ६ महिन्याची मुलगी आहे.
आरोपी दीक्षित पाटील यांची ही तिसरी पत्नी असून या आधीही असाच हिंसाचार करीत असल्याने त्रासापोटी दोन्ही पत्नी माहेरी निघून गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची साक्षीदार प्रिया पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती दीक्षित हरीदास पाटील याला अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय मंगेश मोहोड, पीएसआय राजू गायकवाड, पोलिस गुलाब निमगडे, सचिन गजभिये, प्रमोद गुट्टे, शैलेश मडावी, सचिन खामनकर करीत आहेत.