एकाच रुग्णाला 14 रेमडेसिविर इंजेक्शन लावले, लाइफलाइन रुग्णालय सील

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10782*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

115

एकाच रुग्णाला 14 रेमडेसिविर इंजेक्शन लावले, लाइफलाइन रुग्णालय सील

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, बुलडाणा – कोरोना उपचारांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनवर बंदी घातलेली असतानाही बुलडाण्यातील एका रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क १४ रेमडेसिव्हिरीचं इंंजेक्शन दिल्याचं समोर आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत या रुग्णालयाला सील करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी दिले आहेत.

कोणत्याही रुग्णालयाला कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्ह्याचे शल्य चिकित्सक यांची परवानगी घेणे बंधनकारक असते मात्र, बुलडाण्यातील खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी न घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. याबाबतची तक्रार प्रशासनाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना तात्काळ चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अहवाल स्थापन करण्यात आला आहे.

संबंधित समितीने चौकशी केली असता अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. यामधील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एकाच रुग्णाला तब्बल १४ रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस देण्यात आले होते. या समितीने संपूर्ण अहवाल जिल्हाधिरी एस राममूर्ती यांच्यासमोर सादर केला. त्यांनी संपूर्ण अहवालाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लाईफलाईन रुग्णालय सील करण्याचे निर्देश दिले. तसेच पोलिसातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.