Home Breaking News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10777*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

223 views
0

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार आहे. निवृत्तवेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्त वेतनसोबत रोखीने दिले जाणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी सातवा वेतन आयोग थकबाकीच्या दुसरा हफ्ता ऑगस्ट महिन्याच्या पगाराबरोबर दिला जाणार आहे. तर जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा तसेच इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची थकबाकी रक्कम सप्टेंबर महिन्यातील पगारात दिली जाणार आहे.

शासनाने अधिसूचना काढून 30 जानेवारी 2019  सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षांत, 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षांत, 5 समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे 24 जानेवारी 2019 आणि 1 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) 1 जून, 2020 ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने देण्यात येणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम 1 जुलै 2020 पासून दोन वर्षे म्हणजे 30 जून 2022 पर्यंत काढता येणार नाही.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 रोजी देणे असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता स्थगित ठेवण्यात येत आहे. थकबाकीचा तिसरा हप्ता देण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील.