राज्यात १० हजार रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10772*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

161

राज्यात १० हजार रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ७७१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, दिवसभरात १० गजार ३५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  तर आज कोरोनामुळे १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. राज्यात १ लाख १६ हजार ३६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात ६ लाख १७ हजार ९२६ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार १७३ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६० लाख ६१ हजार ६०४ इतकी झाली आहे

मुंबईतही कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होत आहे. गेल्या २४ तासांत ६९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण आकडा ६ लाख ९६ हजार १०५ इतका झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण हे ९६ टक्के आहे. सध्या मुंबईत ८ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ७१६ दिवसांवर पोहोचला आहे. २३ जून ते २९ जूनदरम्यान कोविड रुग्ण वाढीचा दर हा ०.००९ टक्के इतका होता. ठाण्यात (१६, ११५), पालघर (१,४१८), पुणे (१७,४०७), कोल्हापूर (११,४४४), नाशिक (३,४९४), औरंगाबाद (१,३००), नागपूर (३,००३) करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

देशात मंगळवारी ३६ लाख ५१ हजार ९८३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी २७ लाख ४२ हजार ६३० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ९ हजार ३५३ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ वर पोहोचली आहे.