डिप्रेशन व आयुर्वेद उपचार पद्धती

159

– डॉ. पल्लवी स. थोटे
एम.डी. (संहिता सिद्धांत)
एम.ए. (संस्कृत स्कॉलर)
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – डिपे्रशन म्हणजे अवसाद होय. यामध्ये झोप न येणे, चिडचिडेपणा वाटणे, अशक्तपणा सतत वाटणे, एकाग्रता न येणे, खूप जास्त वजन वाढणे अथवा खूप कमी राहणे आदी अनेक बाबींचा समावेश होतो. कोरोना काळात बेरोजगारी, कौटुंबिक समस्या, सामाजिक वाद-अस्थिरता आदींमुळे प्रत्येक घरात डिप्रेशनचे रुग्ण आढळून येत आहे. सततचे डिप्रेशन यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. काही रुग्णांना या प्रकारची भावना म्हणजे डिप्रेशन आहे व त्याची उपचार पद्धती आहे. या बद्दल अनभिज्ञता आहे. डिप्रेशन सतत राहिल्याने शारीरिक व्याधी थॉयराइड,पीसीओडी, मधुमेह, अतिलठ्ठपणा, आॅटोइम्युन डिसआर्डर यासारखे अनेक आजार निर्माण होत आहे. मनाचा शरीरावर व शरीराचा मनावर परिणाम होऊन
शारिर-मानस (फिजियोसोमॅटिक) आजार सतत निर्माण होत असतात. त्यामुळे आपल्यातील लक्षणे ओळखून योग्य तो उपचार करणे उपयुक्त असते.
आयुर्वेदामुळे स्वस्थ (निरोगी) व्यक्तीने आपले आरोग्य कसे उत्तम ठेवावे व रोगी व्यक्तीला बरे करण्यासाठी जटामासी, अश्वगंधा,ब्राम्ही यासारखी औषधिद्रव्ये आली आहेत व पंचकर्मामध्ये बस्ती रक्तमोक्षण, नस्य आदी कर्माचा डिप्रेशन ठीक करण्यासाठी उपयोग होतो. पंचकर्म उपचार शरीर व मन दोन्हीच्या आजारावर उपयुक्त ठरते. निरोगी व्यक्तीने डिप्रेशनपासून मुक्तता मिळविण्यासाठी खालील उपाय योजावे.
१. सकाळी लवकर उठावे. ब्राम्ह मुहुर्त(सूर्योदयापूर्वी ४८ मिनीटं अगोदर उठावे). थोडक्यात सध्याची उशीरा झोपणे व उशीरा उठणे जीवनशैली टाळावी.
२. सकाळी उठल्यास मलावष्टम्भ (पोट साफ न होणे) तक्रार बºयाच प्रमाणात कमी होते.
३. वड, अर्जुन, खदीर,निम्ब आदी वनस्पतीच्या सालीचे चुर्ण असलेली दन्तमंजन,पेस्ट वापरावी. दात साफ करण्यासाठी कडू, तुरट, तिखट आदी रसाच्या दंतमंजनाचा वापर करावा.
४. नाकामध्ये दोन-दोन थेंब अणुतेल किंवा नीलगिरी तेल टाकावे.
५. शिर, पाद व कानाच्या भागाला तेल अंघोळी अगोदर लावावे.(बालक व वृद्ध व्यक्तीने सर्वांगाला लावावे.) दिवसाला शिरभागाला तेल लावणे शक्य नसल्यास सायंकाळी अवश्य लावावे.
६. पावसाळयात स्नानासाठी कोमट पाणी वापरावे.
७. स्रानानंतर जेवण केल्यास पचनशक्ती वाढते. त्यामुळे शक्य असल्यास त्याप्रमाणे सवयी योजाव्या.
८. गायीचे तूप जेवणामध्ये घ्यावे.
आजार होऊ नये म्हणून सुद्धा बस्ती आदी पंचकर्माचा उपयोग होतो. व आजारी व्यक्तीने आपल्या आजारानुसार व शक्तीनुसार निरोगी व्यक्तीसाठी सांगीतलेली उपक्रम योजावी. पावसाळयात शारीरबल अल्प असते. त्यामुळे व्यायाम अल्प प्रमाणात करावा. काही खाल्लयानंतर व्यायाम करू नये. (आजार निर्माण होण्यास कारणीभूत असते.)
– अनुलोम विलोम व ध्यानाचा डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोग होतो.
– सुरुवातीला शांत ओम ध्वनीचा उपयोग करत ध्यान करावे. त्यानंतर ध्वनीरहित ध्यानस्थ व्हावे.
– आहारामध्ये ज्वारी, बाजरी, फळभाज्या, ताक, दूध, मुगदाळ, मसूरदाळ, आदीचा वापर करावा.(चना दाळ व वाटाणा कमी घ्यावा.)
– सकाळचे भोजन (षडरसयुक्त) केल्यानंतर रात्री पचण्यास हलका आहर घ्यावा. वरील सर्व उपाय शरिर-मानस संतुलन ठेवण्यास उपकारक आहेत.

mob no – 9637976004