Home Breaking News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी अधिका-यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास दर्शवली असर्मथता

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी अधिका-यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास दर्शवली असर्मथता

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10763*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

225 views
0

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी अधिका-यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास दर्शवली असर्मथता

विदर्भ वतन, वृत्तसंस्था/मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी अधिका-यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास असर्मथता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचे कारण देशमुख यांनी त्यासाठी दिले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझी चौकशी करावी, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर देशमुख यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आतापर्यंत दोन वेळा ईडीने देशमुख यांच्या घरी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. दुसरा छापा मागील आठवड्यात टाकण्यात आला होता. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती आली आहे. त्या आधारे ईडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावले आहे. पहिल्या समन्सच्या वेळी देशमुख यांनी वकिलांना पाठवून मुदत मागून घेतली. त्यानंतर ईडीने दुसरे समन्स बजावत देशमुख यांना (२९ जून) मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ईडीच्या अधिका-यांना पत्र लिहून देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचे म्हटले आहे.
आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब आॅनलाइन घ्यावा. आॅडिओ किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईडीने ईसीआर पाठवावा, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे. माज्या वतीने ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.