Home Breaking News विद्यार्थिनीला शिकवताना शिक्षकाने दिले प्रेमाचे धडे, प्रेमाखातर दोघेही अखेर गावातून पळून गेले

विद्यार्थिनीला शिकवताना शिक्षकाने दिले प्रेमाचे धडे, प्रेमाखातर दोघेही अखेर गावातून पळून गेले

88 views
0

विद्यार्थिनीला शिकवताना शिक्षकाने दिले प्रेमाचे धडे, प्रेमाखातर दोघेही अखेर गावातून पळून गेले

विदर्भ वतन, वृत्तसंस्था, जयपूर : या जगात कुणाचे, कुणावर आणि कधी प्रेम जडेल हे काही सांगता नाही येत. आपल्या विद्यार्थिनीला अभ्यासाचे धडे देता देता एक शिक्षक तिच्याच आकंठ प्रेमात बुडाले. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिला इंग्रजीचे धडे देणारे शिक्षक यांचे बघता बघता एकमेकांवर प्रेम जडले. या गोष्टीची त्यांनी आपापल्या घरच्यांना कल्पना दिली. मात्र दोघांच्याही घरून याला विरोध झाला. त्यानंतर या दोघांनीही गाव सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
ही अनोखी लव्ह स्टोरी आहे राजस्थानमधील बडू नावाच्या छोट्याशा गावातील. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचे शिक्षक यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. या काळात त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याची कल्पना आली होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळे होण्याचा सल्ला अनेकदा दिला होता. मात्र सल्ला ऐकेल, ते प्रेम कसले.
घरचे आपल्या प्रेमाला दाद देत नाहीत, हे समजल्यावर अधिक वेळ न दवडता पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. ही घटना घडण्यापूर्वी एका रविवारी या शिक्षकाने गावातील झेरॉक्स सेंटरमधून आधार कार्ड आणि इतर काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढल्या. त्याने एका बनावट सिम कार्डसाठीही दुकानदाराला विनंती केली होती. मात्र दुकानदाराने ते द्यायला नकार दिला.
अशी सगळी तयारी करून त्यांनी एका जागी भेटण्याचा निर्णय घेतला आणि तिथून गाव सोडून ते पळून गेले. ते नेमके कुठे गेले, याचा कुठलीही माहिती कुटुंबीयांना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.