मागताना नाही वाटली कसलीच लाज, एसीबीच्या जाळयात अडकले घेताना लाच

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10746*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

239

मागताना नाही वाटली कसलीच लाज, एसीबीच्या जाळयात अडकले घेताना लाच

विदर्भ वतन,नागपूर : तारसा ता. मौदा येथील तलाठी, कोतवाल आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ७ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तलाठी संजय भगवान पडवार, कोतवाल किशोर बिसन वानखेडे आणि खाजगी व्यक्ती लक्ष्मीनारायण रामचंद्र पोटभरे, असे आरोपींचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकरणातील तक्रारदार हे गांधी वॉर्ड भंडारा येथील रहिवासी आहेत. ते वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांनी जून २0२१ मध्ये मौजा तारसा, ता. मौदा येथे शेतजमीन खरेदी केली. त्याबाबत फेरफार नोंदणी करण्यासाठी तक्रारदार सर्व कागदपत्रासह तलाठी कार्यालय तारसा येथील तलाठी संजय पडवार यांना भेटले. तक्रारदारांनी तेथे फेरफार नोंदणीकरिता अर्ज केला. त्यानंतर २८ जूनला तलाठी संजय पडवार यांनी तक्रारदार यांना फोन करून शेतजमिनीच्या फेरफारसाठी ७ ते ८ हजार रू. खर्च लागेल, असे सांगून त्यांना लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभाग,भंडारा येथील कार्यालयात जाऊन तलाठी पडवार यांच्याविरुध्द तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक महेश चाटे यांनी तक्रारीची गोपनीय शहानिशा करून सापला कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये तलाठी पडवार, कोतवाल किशोर वानखेडे यांनी तक्रारदारास तारसा येथील शेतजमीनीच्या फेरफार नोंदणी करण्यासाठी ७ हजारांची मागणी करून खाजगी इसम लक्ष्मीनारायण पोटणरे यांच्यामार्फत तहसील कार्यालय मौदा येथे लाच रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी मौदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.