Home इतर राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, पोलीस भरती, मेगाभारती व सरळसेवा भरती...

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, पोलीस भरती, मेगाभारती व सरळसेवा भरती लवकरात लवकर करा : आप युवा आघाडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10736*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

159 views
0

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, पोलीस भरती, मेगाभारती व सरळसेवा भरती लवकरात लवकर करा : आप युवा आघाडी

-भरती न केल्यास राज्य व्यापी आंदोलन करणार

विदर्भ वतन, नागपूर : कोरोना-19 चा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण व अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील 2-3 वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. ह्या सर्व बाबी राज्याच्या दृष्टीकोनातून घातक आहेत. युवा वर्ग, विद्यार्थी असा बेजार होत असेल तर राज्याची प्रगती सुद्धा खुंटेल.

आप युवा आघाडी ने राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, पोलीस भरती, मेगाभारती व सरळसेवा भरती लवकरात लवकर करा या मागणीसाठी संविधान चौकात आंदोलन केले व राज्य सरकारला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. विदर्भ संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली खाली व आप युवा संयोजक पीयूष आकरे व नागपुर युवा अध्यक्ष गिरीश तीतरमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात स्वप्नील सोमकुवर, विशाल चौधरी, बबलू मोहाडीकर, हेमंत पांडे, योगेश पराते, किशोर मोडेकर, प्रतीक बावनकर, निशिकांत माटे, स्नेहा गजबिये, अश्विनी कांबळे, विशाल वैद्य, पार्थ मिरे अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.