Home Breaking News आमदार राजूभाऊ पारवे यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व विदर्भ पाटबंधारे विकास कामांचा घेतला...

आमदार राजूभाऊ पारवे यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व विदर्भ पाटबंधारे विकास कामांचा घेतला आढावा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10726*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

81 views
0

आमदार राजूभाऊ पारवे यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व विदर्भ पाटबंधारे विकास कामांचा घेतला आढावा

विदर्भ वतन, नागपूर : मंगळवारला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ येथे विधानसभा क्षेत्रातील सर्व कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळÑच्या अंतर्गत सर्व पुनर्वसन कामांच्या सविस्तर माहिती घेऊन पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्याकरिता नवीन प्रस्ताव बनवून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. तसेच मूळ सुविधे पासून वंचित असलेल्या गावांना सुविधांचा अभाव आहे अश्या गावांचा सर्वे करून घेण्याचे निर्देश दिले.


विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळचे अधिकारी, गावकरी व प्रशासनाचे अधिकारी यांचा सोबत एक समिती गठीत करून मूळ ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्यास सांगितले. सर्व रस्ते पूर्ण करणे,तसेच कुजबा येथील शेतक-यांना जाण्याकरिता रास्ता उपलब्ध झाला पाहिजे याकरिता अधिका-यांना त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था तपासण्यासाठी सांगितले, तसेच थुठानबोरी या गावातील सुद्धा प्रश्न निकाली काढण्यास सांगितले. फेगड येथे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता नवीन योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासोबत मोखेबर्डी उपसा सिंचन योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामांचे माहिती घेतली. तसेच नवीन कामे करण्यास सुचविले, क्षेत्रातील चिचघाट उपसा सिंचन येथील रखडलेल्या प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आदेश दिले.
त्यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक श्री. मोहिते, तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.