Home Breaking News ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

0
ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘मोदी विरोधी घोषणा’
विदर्भ वतन, नागपूर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश सचिव गिरीश पांडव यांचा नेतृत्वात ब्लॉक क्र. ५ ब्लॉक अध्यक्ष विश्वेश्वर अहिरकर यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी मोदीच्या अघोषित आणीबाणी व हुकूमशाही विरोधात आंदोलन न करता फक्त मोदी सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसीचे आरक्षण कोर्टात रद्द झाले याचा निषेध करण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी मोदी सरकारच्या विरोधात मानेवाडा चौक येथे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने नगरसेवक मनोज गावंडे, माजी नगरसेवक सुभाष भोयर, वासुदेव ढोके, शहराचे पदाधिकारी वीणा बेलगे, किशोर गीद, प्रकाश फुके, मामा राऊत, प्रा.राजेश रहाटे, पिंटू तिवारी, मंगेश शातलवार, भोला कुंचनकर, विनोद शिंगणे, विपुल गजभिये, दक्षिण काँग्रेस महिला अध्यक्ष संगीता उपरिकर,प्रदेश युवक काँग्रेसचे निलेश खोरगडे,दक्षिण नागपूर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशांत लोखंडे, प्रकाश ठाकरे, राजेश बेलखोडे, देवराव डेहनकर, राजुभाऊ रहाटे, आकाश कथलकर, पूजा देशमुख, रेखा काटोले, प्रमिला धामणे, लक्षणे, प्रभाग अध्यक्ष अनिल शाहू, प्रभाग कार्याध्यक्ष अरविंद क्षीरसागर, वार्ड अध्यक्ष टापरे,अरुण भोयर, शिवम पलांदुरकर, नागपूर युवक काँग्रेसचे शुभम तल्हार, स्वप्नील बरेय्या, समीर पांडे, नामदेवराव चरपे, रमेश वानखेडे, अमित खंगार, चिकले, कोंद्रे, मनोहर चिमुरकर, विजय सलोडकर, राजेश इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती़
————————-
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेले – देवेंद्र फडणवीस
राज्य सरकार आपल्या अपयशाचे खापर मोदींवर फोडत असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो असे आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिले आहे. ५० टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवले होते, पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले असेही ते म्हणाले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभरात जेलभरो आंदोलन सुरु आहे. नागपुरात व्हेरायटी चौकात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने एक मागासवर्गीय आयोग नेमायचा होता आणि या आयोगाला इंम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी एक एजन्सी नेमायची होती. त्यानंतर ते एका अ‍ॅफिडेव्हीटच्या माध्यमातून न्यायालयात सादर करायचे होते. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आतले सगळे आरक्षण वाचले असते. या सरकारने १५ महिने अ‍ॅफिडेव्हिटच सादर केले नाही. यासाठी सात वेळा तारखा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रातले ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. याला केवळ राज्य सरकारच जबाबदार आहे.”
देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसींचे आरक्षण असताना राज्यातच का नाही असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. राज्य सरकारला ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच १५ महिने वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. पाच जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे भविष्यात ओबीसींना आरक्षणापासू वंचित ठेवण्याचा घाट घालण्यात आला आहे असेही ते म्हणाले. ओबीसी प्रकरणातील याचिकाकर्ता हा काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
ओबीसींचे आरक्षण परत आणू शकलो नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मोर्चे काढण्यापेक्षा ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही मदत करु असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रविण दटके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, आ़ गिरीश व्यास, आ़ अनिल सोले, देवेंद्र दस्तुरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते़