Home Breaking News नागरिकांकडून रेशन धान्याची विक्री, ‘कोरोना योध्दां’ची थट्टाच!

नागरिकांकडून रेशन धान्याची विक्री, ‘कोरोना योध्दां’ची थट्टाच!

0
नागरिकांकडून रेशन धान्याची विक्री, ‘कोरोना योध्दां’ची थट्टाच!

अजय बिवडे, संपादक, विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर –  गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाने जगभर थैमान घातले़ अशातच अनेकांचे रोजगार हिरावले तर, छोट्या उद्योगांना फटका बसला़ रोजगार, शेतमजूर, कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात आजही संकटाचा सामना करावा लागत आहे़ आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे़ अशातच जनजीवन विस्कळीत झाले असतांना नागरिकांना दिलासा म्हणून शासनाने रेशनवरील धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला़ तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जास्त प्रमाणात धान्यही वाटप करण्यात आले़ रस्त्यांवरील बेघर गरजुंना आधार देण्यासाठी काही सामाजिक संस्थानीही पुढाकार घेतला़ प्रत्येक माणूसाने आपल्यापरीने जे होईल ते सहकार्य केले़
कोरोना काळात सारेकाळी थांबले असतांना तसेच बाजारपेठा बंदीमुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवेच्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतांना शिधापत्रिका धारकांना किंवा गरजुंना मोठ्या प्रमाणात रेशनवरील धान्य समाधान देणारे ठरले़ आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच कोरोना काळात सातत्याने आपल्या जीवाची पर्वा न करता माणुसकी या नात्याने कर्तव्य पार पडत असलेल्यांमध्ये रेशन दुकानदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता़ ‘कोणीही उपाशी राहणार नाही’ ही गाठच त्यांनी जणू बांधली होती़ आपली जबाबदारी व कर्तव्यदक्षतेने त्यांनी गरजुंना धान्यांचे वितरण केले़ बोटावर मोजण्या इतके किंवा काही अपवाद वगळता त्यांच्यारूपात गरजुंना ‘देवमाणूसच’ दिसला़ ‘माणूस माणसापासून दुरावला’ अशा कोरोना काळात रात्रंदिवस आपले सामाजिक व मानवी हित रेशन दुकानदारांनी जोपासले़ रेशन दुकान बंद असलेल्या दिवशी ही दुकाने सुरू ठेऊन धान्य वितरण करण्यात आले़ यात अनेक रेशन वितरण करणाºया योध्दांचा मृत्युही झाला़ शासनाच्यावतीने अशा वितरक योध्दांसाइी कुठे मदत पोहचली तर, कुठे आजही प्रतिक्षाच आहे़ मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असतांना स्वताच्या जीवाची काळजी न करता सोशल डिन्टन्सिंग, सँनिटायझर तसेच शासनाच्या प्रत्येक नियमांचे पालन काटेकोररीत्या करीत त्यांनी १२-१२ तास दुकान सुरू ठेवून धान्याचे वितरण केले़ शासनाने धान्य मोफत म्हटले तर वितरण करतांना काही प्रमाणात मनस्तापही सहन करावा लागला़ मात्र नियोजनबद्ध पद्धतीने धान्य वितरण करण्यात आले़ ‘जे आले ते गरजुंना दिले हाच अमुचा धर्म’ त्यांनी पाळला़ मात्र आज तीच परिस्थिती असतांना मोफत मिळत असलेले रेशनवरील धान्य आज इतरत्र विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे़
आज अनेक भागांमध्ये रेशनवरील तांदूळ विकत घेणारे फिरत असतात़ १५ रूपये किलो या दराने ते नागरिकांकडून राशनवरील धान्य विकत घेत आहे़ गल्लोगल्ली फिरून धान्य विकत घेणाºयांनी तो नवा व्यवसाय शोधला असेच म्हणावे लागेल़ आँटो किंवा मिनीडोअरमध्ये धान्य खरेदी नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ नागरिक सुद्धा मोफत मिळालेले तांदूळ १५ रूपये दराने त्यांना विक्री करीत आहे़ यात नागरिकांकडून तांदूळ विक्रीचा वाढता कल पाहता आता खरेदी करणाºयांची व गाड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे़ हेच धान्य खरेदी करणारे त्यावर प्रक्रिया करून तेच धान्य ३५ ते ४० रूपये दराने बाजारपेठांमध्ये विक्रीस नेत आहे़ काही दिवसांपुर्वीच नागपूर शहरात अशाच एका धान्य पुरवठादाराकडून मोठ्या प्रमाणात धान्य हस्तगत केले़ आता पुन्हा केंद्र शासनाच्यावतीने दिवाळीपर्यंत रेशन धान्य मोफत देण्याचे जाहिर करण्यात आले आहे़ त्यामुळे खरेदीदारांचा हा व्याप मोठ्या प्रमाणात वाढेलही़ आज देशात नागरिक कर देतात व त्यातूनच अशा संकटावेळी गरजुंना आधार मिळतो असे म्हटले जाते़ मात्र मागील दिडवर्षांपासून अविरत कार्यरत असणाºया रेशन वितरणधारकांवर निष्कृष्ठ धान्य वितरण करण्याचा ठपका ठेवत नाराजी व्यक्त करणे ही कोरोना योध्दांची थट्टा आहे़ जो पुरवठा शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातो, तोच नागरिकांना वितरीत करण्यात येतो़ मग यात वितरकांचा दोष काय असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो़ आजही अनेक कुटुंब उघड्यावर किंवा मदतीपासून वंचित असतांना मोफत मिळणारे धान्य विक्री करणे योग्य आहे का? नागरिकांनी धान्य विक्रीला प्रतिसाद दिल्या त्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढलेली आहे़ त्यामुळे गरज नसल्यास ते धान्य इतरांना उपलब्ध करून देणे हीच योध्दांना खरी आदरांजली ठरेल़
———————————————————
‘धान्य खरेदीदार आपल्या दारी’
आज नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात रेशनवरील तांदूळ खरेदी करणारे गाड्या घेऊन गल्लोगल्ली फिरतांना दिसत आहे़ केंद्र शासनाने घोषणा केल्याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्यपुरवठा करण्यात येईल़ त्यामुळे हा काळाबाजार भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल़ १५ रूपये दराने हे धान्य खरेदी करून तसेच त्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा बाजारात दुप्पट किंमतीने विकण्यात येते़
————
विक्री न करता ते धान्य गरजुंना द्या!
कोरोना संकटाला दिडवर्ष होत असतांना आजही अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटलेला नाही़ रोजगाराअभावी आर्थिक संकट आजही अनेक कुटुंबांवर कायम आहे़ रेशन दुकानातून मोफत मिळणाºया धान्याची आवश्यकता नसल्यास इतरांना विक्री न करता ते धान्य गरजुंना देऊन सामाजिक कर्तव्य पार पाडावे अशी विनंती विदर्भ वतन परिवाराच्यावतीने सर्व नागरिकांना करण्यात येत आहे़
———————
निष्कृष्ठचा दगड वितरकांच्या माथी
वितरकांना शासनातर्फे दिल्या जाणारे धान्यच शिधापत्रिका धारकांना वितरीत करण्यात येते़ यात गहू, तांदूळ, साखरेचा समावेश असतो़ मात्र नागरिक धान्याचा दर्जा चांगला मिळत नसल्याची ओरड वितरकांच्या नावाने करतात़ शासनाने दिलेलेच धान्य शिधापत्रिकाधारकांना दिले जाते़ त्याचा दर्जा, क्षमता ही खबरदारी अधिकाºयांना ठेवावी लागते़ त्यामुळे वितरकांचा यात काहीही हस्तक्षेप नसतो़