*पाऊस*

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10681*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

125

*पाऊस*

आवडतो मला पाऊस
खूप खूप आवडतं
चिंब भिजायला
त्या मस्त मुसळधार पावसात
भिजायला खूप आवडतं
पण यावर्षीचा पाऊस मात्र
वर्षभरच चालला
मला जागोजागी दिसला
जाणवला
पाऊस या वर्षीचा..
उन्हाने तापलेल्या रस्त्यावर
किराणा व औषधाच्या दुकानासमोरील
रांगातील लोकांच्या
घामाने लथपथ झालेल्या शरीरातून
पाऊस मला जाणवला,
आपल्या आप्ताला वाचवण्यासाठी
जीवाचे रान करणा-या
आई, बहिण, भाऊ, वडील, मित्राच्या धावपळीतून
पाऊस मला जाणवला,
घरच्या कर्त्या माणसाच्या जाण्याने
कोसळलेल्या संकटातून,
पाऊस मला जाणवला,
कुणी मेल्यावर साधं पाहू ही न शकणा-या असहाय्यतेतून,
भांडयात अन्नाचा कण नसलेल्या
अंधा-या झोपडीच्या दारातून,
पाऊस मला जाणवला,
अन्नासाठी हात पसरून
बसलेल्यांच्या आशाळभूत नजरेतून,
पाऊस मला जाणवला,
आई, बहिण, भाऊ, वडील, मित्र गेल्यावर
अश्रु सुकलेल्या डोळयाने पहात
येणा-या हुंदक्यातून
पाऊस मला जाणवला
नव्हे
तो वर्षभर
मुसळधार बरसतच राहिला…..
मुसळधार बरसतच राहिला…..
– राजेश कुबडे,
नागपूर