दिग्रस परिसरात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट
– नागरिकांनी केली कार्रवाई मागणी
विदर्भ वतन, दिग्रस : दिग्रस तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय केला जात आहे. दारू विकेत्यांकडून बनावट दारूची विक्री होत आहे. नकली दारूच्या सेवननामुळे अनेक मद्यपींचे आरोग्य बिघडून शारीरिक व जीवित नुकसान होत आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिग्रस शहरात शिवाजी चौक व मानोरा चौक परिसरात नकली दारू विक्री केली जात आहे. येथे लॉकडाउन पासून मद्यपींची संख्या वाढली आहे. या मद्यापींंचा त्रास घरच्या लोकांना तर होतच आहे पण यांच्यामुळे महिला वर्ग व सज्जन नागरिक सुद्धा परेशान आहे. शहरातील अवैध दारू विके्रत्यांवर कार्रवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

