सीआयटीयुच्या आशांनी संविधान चौकात केली श्रद्धांजली सभा

विदर्भ वतन, नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटीयु तर्फे संविधान चौकात 15 तारखेपासून चालू असलेल्या किमान समान वेतनाच्या मागणी करिता कृती समितीने राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यानुसार 15 जूनपासून राज्यातील काना कोप-यातून आशा व गटप्रवर्तक किमान समान वेतन मिळावे. आशांना 18000 व गटप्रवर्तक यांना 21000 मिळावे या मागणी करिता तसेच यांना सरकारी कर्मचा-यांचा दर्जा देऊन इतर सोयी उपलब्ध करून द्याव्या या मागणी करिता राज्यभर आंदोलन केले. परंतु कृती समितीने केलेल्या आंदोलनाचे पडसाद हे राज्य शासनाच्या कानी पोहोचले. आंदोलन संपावे या करिता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. त्यानुसार आशा वर्कर यांना 1000 हजार रुपये महिना व गटप्रवर्तक यांना 1200 रुपये महिना. तसेच कोरोना काळाकरिता 500 रुपये महिना देण्याचे मान्य केले. त्याच बरोबर पुढील वर्षी जुलैपासून परत पाचशे रुपयाची वाढ करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. इतर संघटनांनी संपातून माघार घ्यायची भूमिका घेतली. परंतु सीआयटीयू ने समाधान कारक निर्णय न घेणा-या शासनाच्या भूमिकेचा स्वीकार करत आज नागपूरच्या संविधान चौकात श्रद्धांजली सभा घेतली. त्याच प्रमाणे पुढील लढा आशा व गटप्रवर्तकांच्या हक्कासाठी सीआयटीयु सतत रात्र दिवस लढत राहणार. संघटना स्वबळावर राष्ट्रीय स्तरावर मुख्य भूमिका बजावून किमान समान वेतन मिळविण्याकरिता दिल्ली दरबारी धडक देण्याची तयारी करणार.
आज संविधान चौकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठेनी केले. शोक सभेला मार्गदर्शन किसान सभेचे नेते कॉम्रेड अरूण लाटकर , नागपूर चे जिल्हा महासचिव कॉम्रेड दिलीप देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजच्या शोकसभेचे प्रमुख नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, कांचन बोरकर, पूर्णिमा पाटील, शालिनी सहारे, मंदा गंधारे, रूपलता बोंबले, नंदा लिखार यांनी केले.

You missed