मागासवर्गियांचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी माळी महासंघाची कारवाईची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10661*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

216

मागासवर्गियांचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी माळी महासंघाची कारवाईची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : माळी महासंघ शाखा महाराष्ट्र प्रदेश अविनाश ठाकरे व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अरुण तिखे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना माळी महासंघाच्या चमूने निवेदन दिले. माळी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश, पूर्व विदर्भ आघाडी नागपूर शहर व महिला आघाडी नागपूर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे शुक्रवार दि. 25 जून ला ओबीसी इतर संघटनांतर्फे निवेदन देएयात आले.


याप्रसंगी माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र अंबाडकर, पूर्व विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, नागपूर शहर अध्यक्ष शंकरराव चौधरी, मुख्यसचिव राजेंद्र पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सौ.विजया सुरेंद्र अंबाडकर, मुख्यसचिव सौ.उज्वला राजेंद्र पाटील, कोषाध्यक्ष सौ.शालिनी भालचंद्र पवार, राहुल पलाडे, महादेवराव हरणे, विभागीय उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप दहिकर, शहर उपाध्यक्ष सचिन ठाकरे उपस्थित होते.