Home Breaking News मनपा सभागृहात गाजले अंबानी,अदानी,लखाणींचे नाव!

मनपा सभागृहात गाजले अंबानी,अदानी,लखाणींचे नाव!

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10647*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

50 views
0

मनपा सभागृहात गाजले अंबानी,अदानी,लखाणींचे नाव!

दानागंज मॉलच्या बांधकामाच्या मुदतवाढीचा मुद्दा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर- तब्बल २००७ पासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या दानागंज येथील मॉलचे बांधकाम पूर्ण करण्याला महापालिकेच्या महासभेने मंगळवारी पार पडलेल्या सभेत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. या मॉलचे बांधकाम पूर्ण करण्याची जवाबदारी आॅरेंज सिटी मॉल प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कपंनीवर होती. ही कंपनी नेमकी कोणाची आहे?असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्र्रफुल्ल गुडधे पाटील यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. एवढंच नव्हे तर या मुद्दावर चर्चा करताना सभागृहात चक्क अंबानी,अदानी व लखाणी यांचे नाव ही निनादले!
प्र्रफुल्ल गुडधे पाटील यांनी आॅरेंज सिटी मॉल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोणाची आहे हे सर्वांनाच माहिती आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने या कंपनीला कायम झुकते माप देण्यात येते.अनेक वर्षांनंतरही कंपनीला करारानुसार मॉलचे बांधकाम पूर्ण करता आले नाही. तरीही महापालिकेच्यावतीने मुदतवाढ देण्याचा फेरप्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवला जात आहे. बांधकामाची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपली असताना कंपनीकडून दंड आकारण्यात येत नाही. ही कंपनी आॅरेंज सिटी वॉटर लिमिटेडची उपकंपनी असल्याने महापालिकेकडून नियमबाह्यरित्या पाठराखण करण्यात येते. कंपनीचे मालक हे लखाणी असल्यामुळे व मनपा प्रशासन नेहमीच त्यांची पाठराखण करीत असल्यामुळे एवढे कंत्राट तुम्ही लखाणींना दिले.संपूर्ण शहरच लखाणींना देऊन टाका ना?असा संताप त्यांनी व्यक्त केला.