कविते मधून उगवत गेलो(गझल)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10643*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

242

कविते मधून उगवत गेलो(गझल)

निर्धाराने अपयश सारे पचवत गेलो
डोळे पुसून मनास माझ्या हसवत गेलो
नियतीच्या या दुःखाचा मी भरला सागर
मनास हलके करण्या थोडे उसवत गेलो
आत वेदना सुया टोचल्या त्याही जहरी
शब्दरूप मी कविते मधून उगवत गेलो
जिंदगीत या असाच झिजलो चंदनापरी
सरणा वरती जाताना मी रडवत गेलो
घाव सोसले पाडण्यास मग पैलू भारी
कोरत कोरत छान मला मी घडवत गेलो
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
      जिल्हा :- सोलापूर
       9405237081