आ. राजू पारवे यांनी सोडवला ग्रामपंचायतीचा थकित वीज बिल व पानी बिलाचा प्रश्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10628*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

223

आ. राजू पारवे यांनी सोडवला ग्रामपंचायतीचा थकित वीज बिल व पानी बिलाचा प्रश्न

विदर्भ वतन, उमरेड : कोरोना काळात ग्रामपंचायत विजेचे बिल भरू न शकल्यामुळे ग्रामपंचायत वर मोठे वीज बिल व पाणी पुरवठा चे बिल उर्वरित असल्यामुळे त्यांना ते भरणे अशक्य होतं होते त्यामुळे ठीक ठिकाणी गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निमार्ण होत होता ही फार गंभीर बाब असल्यामुळे राजू पारवे आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांनी मा.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांच्या याच प्रयत्नामुळे त्यांच्या पाठवुरावामुळे शासनाने नवीन शासन निर्णय काढून 15 वे वित्त आयोगा मधूनच वीज बिल भरणा करावे असे आदेश दिलेले आहे. त्यामुळे इतर पथ दिव्याचे वीज देयक व पाणी पुरवठाचे वीज देयक यांचे बिल आता 15 वे वित्त आयोगातून देता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न व पथदिवे याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.