Home Breaking News जावयाने बंदूकीतून गोळी झाडून का केली सास-याची हत्या!

जावयाने बंदूकीतून गोळी झाडून का केली सास-याची हत्या!

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10621*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

55 views
0

जावयाने बंदूकीतून गोळी झाडून का केली सास-याची हत्या!

विदर्भ वतन, अहेरी – अहेरी शहरातील धरमपुर वॉर्डात पोलीस जावयाने कौटुंबीक वादातून सास-याची बंदूकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना काल रात्रौ १0 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे अहेरी एकच खळबळ उडाली आहे. मृतक सास-याचे नाव मारोती मत्तामी रा. खोरडा ता. चामोर्शी असे आहे. तर आरोपी जावयाचे नाव मनोज गावडे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार मनोज गावडे हे पोलीस दलात कार्यरत आहेत. काल बुधवारी मारोती मत्तामी हे अहेरी येथे आपल्या मुलीला भेटायला आले होते. त्याची मुलगी व जावयात कौटुंबिक वाद सुरू होता. सदर वाद सोडविण्यासाठी मारोती मत्तामी अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात मनोज गावडे यांच्या घरी आले होते. काल रात्रौ १0 वाजताच्या सुमारास जावई आणि सास-यात कौटुंबिक वादातून भांडण झाले. वाद विकोपास जाऊन रागाच्या भरात मनोजने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यात सास-याचा जागीच मृत्यू झाला.
बंदुकीच्या गोळीचा आवाज येताच आजूबाजूचे लोक जागे झाले. त्यांनी काय घडले याची माहिती घेतली असता जावयाने सास-यावर गोळी झाडली असे समोर आले. यानंतर या घटनेची माहिती अहेरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी आरोपी मनोज गावडे याला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पंचनामा गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास अहेरी पोलीस करत आहेत.