Home Breaking News करंट लागून चिमुकल्याचा करुण अंत

करंट लागून चिमुकल्याचा करुण अंत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10612*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

167 views
0

करंट लागून चिमुकल्याचा करुण अंत

विदर्भ वतन, उमरेड : उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील बाजार चौकात गुरुवारी (२४ जून) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शौचास बसलेल्या चिमुकल्याचा उघड्या विद्युत डीपीच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. नैतिक पूजाराम बावणे (वय ३ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत नैतिकचे वडील पूजाराम हे मासेमारीचा व्यवसाय करतात. गुरुवारी नैतिकची प्रकृती बिघडली. अशातच त्याला डॉ. टिकेश तेलरांधे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. नैतिकचे वडील बाहेर गेल्याने आजी पुष्पा वाघधरे या आपल्या नातवासोबत होत्या. डॉ. तेलरांधे दवाखान्यात नसल्याने पुष्पा काही वेळ थांबल्या. अशातच नैतिकला शौचास जायचे होते. त्याला उघड्यावर बसविण्यात आले. नैतिक शौचास बसला असतानाच तेथे गाय आली. आजी पुष्पा यांनी गाईला हाकलण्यासाठी धाव घेतली. दुसरीकडे नैतिकही उठला. अशातच त्याचा जवळच्या उघड्या डीपीच्या तारांना स्पर्श झाल्याने तो जागीच कोसळला.
पुष्पा यांनी त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यासुद्धा जखमी झाल्या. लगेच नैतिकला सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यानंतर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी नैतिकला मृत घोषित केले.