Home Breaking News रंजीत सफेलकरला सुपारी देणारा ‘तो’ गवसेना?

रंजीत सफेलकरला सुपारी देणारा ‘तो’ गवसेना?

408 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – कुख्यात गुंंड रंजीत सफेलकर सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली अटक आहे़ खुनासोबतच अवैधरितत्या जमिन हडपणे, धमकी देऊन खंडणी वसुल करणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहे़ यासोबतच त्याचे साथीदार शरद हाटे, भरत हाटे यांच्यासह इतर सहा ते सात आरोपींना सहआरोपी करण्यात आले आहे़
निमगडे हत्याकांड हे ५ कोटींची सुपारी देऊन घडविण्यात आले अशी सर्वत्र चर्चा आहे़ मात्र तपास यंत्रणेला अद्यापही सुपारी देणारा तो कोण याचा सुगावा लागलेला नाही़ आरोपींना रिमांडवर घेऊन अधिक माहिती मिळविण्याचा कयासही लावल्या गेला़ मात्र तपास यंत्रणेच्या हाती ठोस काही लागले नाही़ यातच सफेलकरचा मित्र श्रीनिवास याच्याही हत्याकांडात तो आरोपी आहे़ ५ कोटींची सुपारी देणारा शहरातील मोठी आसामी असल्याचीही कुजबुज होती, तर कोणी राजकीय क्षेत्रातील असल्याची चर्चा करीत होता़ यासर्व घटनाक्रमानंतर नेमका मास्टरमाइंड आरोपी कोण हा प्रश्न निमगडे यांच्या कुटुंबासह नागरिकांना आहे़ त्यामुळे अनेक वर्षांपुर्वींच्या गुन्ह्यांना न्याय मिळवून देण्यास पोलिस आयुक्त यांनी दाखविलेली तत्परता याही प्रकरणात दिसेल का असाही प्रश्न यानिमीत्ता उपस्थित होत आहे़