नागपुरकर अमेयने निर्माण केले सामान्यांना परवडणारे झूम सोलर

303

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर –  जेथे अधिक सुर्यप्रकाश असतो तेथे सोलर पॅनल्स बसविण्यास पसंती असते. परंतु हे पॅनल बाहेर बसवित असल्याने पक्ष्यांची विष्ठा, धुळ इतर घाण हे सौर पॅनल्सचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. सौर पॅनल्सचे उत्पादन २० ते ४० टक्के पर्यंत खाली येते. त्यामुळे पॅनलची देखभाल करणे, त्यातील त्रुटी आपल्याला दूर करावी लागते. कोरोनाच्या काळात या सोलर पॅनलची काळजी कोरोना काळात घेतांना अधिकाधिक लोक सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्याय निवडतो. तर आत्तापर्यंत सामान्यांना परवडणारी यंत्रणा देखील यात नव्हती. परंतु आता झूम सौरने एक सोलर स्प्रिंकलर डिझाईन केले असून ते पेटंट, शक्तीशाली आणि सर्वांना परवडणारे आहे. मुळचा नागपुरकर इलेक्ट्रॉनिक अभियंता अमेय बन्सोड याने ही यंत्रणा तयार केली आहे. हे सोलर पॅनल सामान्यांना परवडणारे तर आहे. शिवाय आता स्वयंचलित असून स्वच्छता व्यवस्था यात आहे. या प्रणालीला आधीपासूनच देशासह परदेशातून मागणी आहे. विशेष म्हणजे ही संपर्क विरहित स्वयंपूर्ण अशी प्रणाली आहे. या सिस्टीमद्वारे मॅन्यूअल साफसफाई करण्यापेक्षा पाण्याची बचत होते. कोणत्याही आकाराचे सोलर प्लॉट केवळ एका मिनिटात साफ होउ शकते. या सिस्टीमचे पेटंट रेकॉर्ड नउ महिन्यात मंजूर झाले आहे. हि यंत्रणा जगातील सर्वांत शक्तीशाली सफाई स्प्रीक्लरपैकी एक असून ही यंत्रणा एवढी यशस्वी झाली की अवघ्या काही महिन्यात पॅन इंडिया सहा मेगावॅट इतकी विक्री करू शकला. आम्हाला डीलरशीप बद्दलही विचारणा झाली असून आता प्रत्येक मोठ्या गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा या राज्यात आमचा डीलर आहे. झूम सौर हे भारतातील एकमेव स्वच्छता उपकरण निर्माता आणि विकसीतांपैकी एक आहे. आभासी व्यासपीठावर सौन पॅनल क्लिqनग इक्व्पिमेंटची अव्वल विक्रेता अ‍ॅमेझान देखील आहे.अधिक माहितीसाठी www.झूमसोलर.इन

वर भेट द्या.