Home Breaking News आयुर्वेद आरोग्यरक्षण करणारे विज्ञान…वर्षाऋतुचर्या

आयुर्वेद आरोग्यरक्षण करणारे विज्ञान…वर्षाऋतुचर्या

136 views
0

– डॉ. पल्लवी स. थोटे
एम.डी. (संहिता सिद्धांत)
एम.ए. (संस्कृत स्कॉलर)
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – आजार निर्माण होण्यास तुमचा दैनंदिन, रोजचा आहार (खाणे-पिणे) व वातावरण (काळ) कारणीभूत आहे. अयोग्य वेळी, अयोग्य प्रमाणात खाणे व वातावरण उदा. हिवाळयात अती थंडी किंवा ऊन असणे किंवा पाऊस येणे-अधून मधून अशा प्रकारे काळाचा अयोग, अतीयोग व मिथ्यायोग आजार निर्मितीकारक असते. त्यामुळे आपण योग्य त्या ऋतुत योग्य तो आहार घेणे आदि उपयुक्त असते.
तिसरा महत्वाचा हेतु म्हणजे दैनंदिन आपला व्यवहार विहार होय. कुठल्या प्रकारचे तुमचे काम आहे शारीरिक किंवा बौद्धिक या प्रकारचा हेतु सुद्धा रोग होण्यासाठी सुद्धा कारणीभूत असतो. हे हेतु आजार निर्मिती करणारे. कारण वात, पित्त, कफ बिघडवतात व पर्यायाने रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आदि भाव दूषित होउऊन आजार हा दुर्धर होत असतो.थोडक्यात जास्त काळ आजार निर्माण होउऊन झाल्यास चिकित्सा करण्यास कष्टसाध्य बनतो. त्यामुळे अधून मधून येणारा ताप, सर्दी, खोकला, अ‍ॅसिडीटी आदी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. थोडक्यात चिकित्सा केल्यास आजाराचे उपद्रव व रुग्णाची आथक हानी टळू शकते. पावसाळयात कुठला आहार विहार घ्यावा या संदर्भात आयुर्वेदोक्त विवेचन खालीलप्रमाणे आहे.
-वर्षा ऋतुत पचनशक्ती निसर्गत: मंद असते.
-जठराग्नी म्हणजे पाचनशक्ती वाढविणारे पदार्थ जेवणात घ्यावे.
उदा. पुराण ज्वारी, पुराण गहू, मुह, मसूर, आदी. दाळ, जिरा, धनीया पावडर, लसून आदींचा जेवणात उपयोग करणे. पावसाळयात निसर्गत: शारीरातील वात दोष अधिक प्रमाणात वाढल्याने वाताचे आजार वाढतात. त्यामुळे वाताचे विकार प्रशमनासाठी वाती चिकित्सा श्रेष्ठ आहे. वर्षा ऋतुत अतिशय पचण्यास जड पदार्थ उदा.रसगुल्ला,श्रीखंड, गुलाब जामून, पुरी, आदी आहारात घेऊ नये किंवा अत्यल्प प्रमाणात घ्यावे.
वारंवार पदार्थ खाउऊ नये. प्रथम खाल्लेले अन्न पचल्यानंतर दुसरे अन्न घ्यावे. तहान लागल्यावर पाणी प्यावे. अति प्रमाणात पाणी पिऊ नये किंवा कमी सुद्धा पिउऊ नये.
स्वकल्याएाकारी व समाज कल्याणकारी उपजीविका साधन योजावे. नेहमी स्वत:विषयी व इतरांविषयी अभिष्टचिंतन ठेवावे. वरील सर्व उपाय आरोग्याचे रक्षण करतात.
आजार निर्माण कसा होतो?
केवळ औषध खाणे म्हणजे बरे होणे होय?
अलीकडच्या काळात आपण दररोज गोळया खाणे म्हणजे उपचार असे समझतो. किंबहुना औषधे खाण्याची सवय आपण जीवनाचा अविभाज्य भाग समजला आहे. परंतु त्यावर काही उपाय असू शकतो का? उदा. रोज छातीत जळजळ होत असल्यास किंवा घशात आंबट पाणी येत असल्यास अ‍ॅसिडीटीची गोळी खाणे… हे पूर्णत: बंद होउऊ शकते का? तर उत्तर असे राहील तुम्ही प्रयत्न केल्यास नक्कीच सुटकेचा निश्वास मिळू शकतो. एवढेच नव्हे आयुर्वेद ग्रंथामध्ये रोग पूर्णत: बरा होण्यासाठी व पुन्हा होउऊ नये (अपुनर्भव) या करित कारणमीमांसा व हेतू (रोग निर्माण कारक) विपरीत चिकित्सा वर्णित आहे. सध्याच्या जीवनशैलीजन्य आजारात थायराईड, पी.सी.सी.ओ.डी. डीप्रेशन व अनेक आजार निर्मितीमध्ये व उपचारामध्ये हेतु (रोगउत्पादक) कारण (आहार विहार) यांची अग्रगण्य भूमिका आहे.
माझ्या प्रत्येक रुग्णाच्या उपचारामध्ये या प्रकारची उपचार पद्धती उपयोगात आणल्याने रुग्ण अपस्मार, टॉर्ल्सालाईटीस, पीसीओडी, लिवर डिसआॅर्डर आदी आाराचे बरे आहेत. रुग्ण शरीर व मनाने निरोगी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा दैनंदिन उत्तम जीवनशैली विषयक शास्त्रोक्त माहिती हवी असल्यास तशी प्रतिक्रिया द्या. आयुर्वेद संहिता ग्रंथातील अथांग सागरातील मोती मी तुमच्या पर्यंत पोहोचवेल. यामध्ये ऋतुनुसार आहार-विहार अशा अनेक बाबींचा समावेश आहे. व ज्या रुग्णांना त्यांच्या दैनंदिन जीवनशैली विषयक काही सल्ला हवा असल्यास त्यांनी ओपीडी टाइमिंग मध्ये येऊन दाखवावे.