Home आरोग्य सिरसपेठ मधील गडरलाइनच्या समस्येचे निराकरण करा

सिरसपेठ मधील गडरलाइनच्या समस्येचे निराकरण करा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10574*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

81 views
0

सिरसपेठ मधील गडरलाइनच्या समस्येचे निराकरण करा

-उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन

विदर्भ वतन, नागपूर : आम आदमी पार्टी मध्य नागपूरचे सिरसपेठ मधील गटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला नागपूर उपाध्यक्ष निलेश गोयल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
प्रभाग १८ मधील सिरसपेठ मध्ये गटारीची दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिकडे तिकडे तुटलेली झाकने दिसून येतात. ठेकेदाराने नवीन बनवलेल्या गटारीचे खराब कामामुळे पाइप लाइन मधील लिकेज झाल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची माहिती मनपा मधील लोककर्म विभागाला देऊन ही समस्या सोडविण्यात आलेली नाही. यावेळी मध्य नागपूर प्रभारी सौ. कृतल आकरे, निलेश गोयल, आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे प्रामुख्याने उपस्थित होते.