सतरंजीपुरा झोन-शारदा मंदिर ते पांचपावलीकडे जाणारा रस्ता पुन्हा तयार करावा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10559*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

163

सतरंजीपुरा झोन-शारदा मंदिर ते पांचपावलीकडे जाणारा रस्ता पुन्हा तयार करावा

-आप पक्षाने केली मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : शारदा मंदिर ते पांचपावलीकडे जाणारा रस्त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी रिचा गुप्ता यांच्या नेतृत्वात सतरंजीपुरा झोनच्या उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले. आम आदमी पार्टी, मध्य नागपूरचे संघठन मंत्री प्रभात अग्रवाल यांनी उपायुक्तांना ही समस्या त्वरित सोडवायचा आग्रह केला.
शारदा मंदिरापासून पांचपावलीकडे जाणारा रस्त्याचे बांधकाम जुना डांबर न काढता सीमेंट टाकून रस्ता नवीन बनविला गेला. ज्यामुळे लोकांच्या घरांची पातळी खाली गेली. या पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. नियोजन न करता रस्त्यांची कामे होत असल्याने त्याचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
त्रस्त नागरिकांनी आम आदमी पार्टी मध्य नागपूरच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधला. यानंतर, कार्यकर्त्यांनी रस्त्याची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. नागरिकांशी सल्लामसलत केल्यानंतर रस्ता बांधकामातील चुक सुधारली पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. यासाठी रस्ता पुन्हा तयार करण्याची आवश्यकता आहे.
निवेदन देते वेळी अर्चना शेंभेकर, रोशनी बांबळ, प्रवीण कडू, देवेंद्र तुमाने, गिरीश तितरमारे, नागपूर युवा मोर्चा अध्यक्ष, लक्ष्मीकांत दांडेकर, मध्य नागपूर अध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.